रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा; नाना काटे यांची मागणी

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये सध्या अनियमीत आणि कमी दाबाने वीजपुरवठा सुरू असून याचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे. महापालिकेचे  माजी विरोधीपक्षनेता नाना काटे यांनी या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या पिंपळे सौदागर, रहाटणी येथील वरिष्ठ अभियंता यांना पत्र दिले आहे.

या पत्रात काटे यांनी म्हटले आहे की,  रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर गावठाण व सोसायटी बहुल आहे. या परिसरात घरुन काम करणा-यांची संख्या जास्त असून सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील सुरु आहेत. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील लाईट  रात्री-अपरात्री  जाण्याचे प्रमाण वाढले आहे. उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. योग्य क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्यामुळे विजेवर आधारित उपकरणे नादुरुस्त होतात. यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनीधी या नात्याने आम्हाला त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तसेच या भागातील एखाद्या ठिकाणी खोदकाम करताना केबल डॅमेज झाल्यास लवकरात लवकर दखल संबंधित अधिकारी व कामगारांकडून घेतली जात नाही. ही खूप गंभीर बाब असून याची दखल घेण्यात यावी.

         रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील महावितरणच्या तक्रारीचे लवकरातलवकर निराकरण करावे व विद्युत पुरवठ्याचा सुरु असलेला लपंडाव त्वरित थांबवावा.




रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा; नाना काटे यांची मागणी रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा; नाना काटे यांची मागणी Reviewed by ANN news network on ४/२४/२०२४ ०४:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".