पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून १२ जणांनी २१ अर्ज नेले आहेत. काल १८ एप्रिल रोजी २७ जणांनी ४९ अर्ज नेले आहेत. त्यामुळे आजवर ३९ व्यक्तींनी ७० अर्ज नेले आहेत.
क्रांतिकारी जयहिंद सेनेचे यशवंत विठ्ठल पवार (कर्जत) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे आज सादर केला आहे.
आज अर्ज नेणार्यांमध्ये डॉ.अक्षय गंगाराम माने (काळेवाडी, वंचित बहुजन आघाडी), पंकज प्रभाकर ओझरकर (चिखली, आखिल भारतीय परिवार पार्टी), फुलचंद मंगल किटके (पनवेल, बहुजन समाज पार्टी), इंद्रजित डी.गोंड (खोपोली रायगड, अपक्ष), ज्योत ईश्वर भोसले (पनवेल , बळीराजा पक्ष), साईनाथ जगन्नाथ डोईफोडे (पनवेल, अपक्ष), विशाल तुळशिराम मिठे (थेरगाव, अपक्ष), राजेंद्र मारुती काटे (जुनी सांगवी , अपक्ष), सचिन महिपती सोनवणे (पिंपरी, वंचित बहुजन आघाडी), गोपाळ यशंवतराव तंतरपाळे (देहुरोड, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी), मारुती अपराई कांबळे (पिंपळे निलख, अपक्ष), शिवाजी किसन जाधव (थेरगाव,अपक्ष) यांचा समावेश आहे.
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ ०४:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: