विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चंद्राबाई चावजी भोईर (७०)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून,त्यांच्या कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या चंद्राबाई भोईर यांनी कळंबुसरे येथील आदर्श ग्रामोद्धार,प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षपदावर काम केले आहे.
यामध्ये गावासह चिरनेर विभागातील महिलांच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला उत्तेजन देण्यासाठी नियमित पुढाकार घेत होत्या.आदर्श महिला मंडळाच्या वतीने गावोगावी धार्मिक कार्यक्रमात सादर करण्यात येणाऱ्या महिलांच्या पारंपरिक फिरक्यांच्या नाचगाण्यामध्ये प्रमुख गायिका म्हणून कार्यरत असलेल्या चंद्राबाई भोईर यांनी समाजात आपली अनोखी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या जाण्याने आदर्श मंडळातील मार्गदर्शक हरपल्याचे दुःख येथील महिलांनी व्यक्त केले आहे.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
पत्रकार महेश भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश भोईर यांचे त्या आई होत्या.त्यांच्या पश्चात त्यांचे पती,दोन मुली,दोन मुलगे,सुना,नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.सांत्वनासाठी येणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा दुखावटा आणू नये असे आवाहन त्यांचे चिरंजीव महेश भोईर आणि उमेश भोईर यांनी केले आहे.
कळंबुसरे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चंद्राबाई भोईर यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ ०८:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: