उरणमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सुरू

 


विठ्ठल ममताबादे

उरण : उरण येथे दि १० एप्रिल रोजी  पीएम-जनमन अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल मेडीकल युनिट ची सुरुवात पंचायत समिती उरण येथे समीर वठारकर(गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण), डॉ. बाबासो काळेल (वैदयकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय उरण) यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . याप्रसंगी डॉ. राजेंद्र गुंडाप्पा ईटकरे (तालुका आरोग्य अधिकारी उरण),किशोर उमते (विस्तार अधिकारी आयसीडीएस उरण), विनोद मिंडे (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत),संतोष परदेशी (तालुका आरोग्य सहाय्यक उरण), मोबाईल मेडिकल युनिटचे सर्व सदस्य, मुनिल म्हात्रे,  निशांत पाटील, गणेश आग्रावकर व पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत वैदयकीय चमुदवारे आदिवासी गावातील सर्व नागरिकांची तपासणी तसेच त्यांना शासनांच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती देणे व मदत करणेबाबत नियोजीत असल्यामुळे तालुक्यातील अदिवासी लोकांना घरपोहोच आरोग्यसेवा मिळणार आहेत तरी तालुक्यातील गावकरी यांना या टिमला सहकार्य करुन लाभ घेण्यात यावा असे आवाहन डॉ. राजेंद्र गुंडाप्पा ईटकरे- तालुका आरोग्य अधिकारी उरण यांनी केले आहे.
उरणमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सुरू उरणमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सुरू Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ ०९:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".