विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील गावांतील एक सामाजिक मंडळ गोल्डन ज्युबली मित्र मंडळ ११ मे रोजी आपला ३७ वा वर्धापन दिन साजरा करणार आहेसारडे गावाच्या तलावाशेजारी असणाऱ्या वडाच्या पारावर ( ज्या पाराच्या मध्यभागी असणारा शेकडो वर्षा पूर्वीचा भव्य असा वटवृक्ष मागील काही वर्षा पूर्वी सुकून उन्मळून पडल्याने )त्याच ठिकाणी एका मोठ्या अश्या वटवृक्षाची लागवड करण्यात आली. ज्या मुळे गावांतील महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा देखील करता येईल आणि पुढे जाऊन त्या वटवृक्षाच्या माध्यमातून लोकांना शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळेल त्या लागवड केलेल्या वटवृक्षाच्या ठिकाणी बांधलेला भव्य असा पार सुध्दा गोल्डन ज्युबली मित्र मंडळाने आपल्या मंडळाच्या स्वखर्चातून आणि श्रमदानातून सन १९९० साली बांधलेला आहे.
गोल्डन ज्युबळी मित्र मंडळाच्या वतीने गुडीपाडवाच्या दिवशी ज्या मोठ्या अश्या वटवृक्षाची लागवड करण्यात आली तो वटवृक्ष देखील उरण - कळंबुसरे गावातील नाना मंगळू पाटील या निसर्गप्रेमीने भेट दिला.
गोल्डन ज्युबली मित्र मंडळाच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक अनोखी अशी ही निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली. वटवृक्ष लागवडीच्या या आदर्शवत अश्या कार्यात खूप अशी मेहनत आणि परिश्रम घेतले ते गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष हिराचंद म्हात्रे,उपाध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच शशिकांत म्हात्रे,माजी अध्यक्ष नवनीत पाटील,खजिनदर संजिव माळी, कार्याध्यक्ष देविदास पाटील, सल्लागार दिनेश म्हात्रे आणि या कार्यात खास अशी उपस्थिती आणि परिश्रमरुपी सहकार्य सारडे गावचे माजी उपसरपंच श्यामकांत पाटील यांचे लाभले.या सर्व मंडळींच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक अनोखी अशी निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वटवृक्षाची लागवड करून उभारली निसर्ग संवर्धनाची अनोखी गुढी !
Reviewed by ANN news network
on
४/१०/२०२४ ०९:०३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१०/२०२४ ०९:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: