चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रमजान ईदीनिमित्त गुरुवारी सर्व मुस्लिमांना शुभेच्छा दिल्या.
आकुर्डी येथील शिवसेनेचे विभागप्रमुख फारुख शेख तसेच चिंचवड येथील अख्तर पिंजारी, अन्वर पिंजारी, तौहीद पिंजारी तसेच हमीद मुलाणी, लतिफ मुलाणी यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. मुस्लिमांनी देखील खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
खासदार बारणे यांचे अनेक मुस्लिम कुटुंबांशी अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. मुस्लिम समाजातील कोणत्याही अडीअडचणींच्या वेळी खासदार बारणे मदतीसाठी धावून येतात. त्यामुळे मुस्लिम मतदार देखील खासदार बारणे यांच्या पाठीशी उभे राहतात, असे हमीद मुलाणी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: