मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत खासदार बारणे यांच्या चिंचवडमध्ये भेटीगाठी

 

चिंचवड :  चिंचवडगावातील ऐतिहासिक मंगलमूर्ती वाड्यात जाऊन मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त‹, मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले व मंगलमूर्तींचा प्रसाद देऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी  माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे तसेच बाळासाहेब गायकवाड, नारायण लांडगे, राजेश आरसूळ, ऋषिकेश लोंढे आदी पदाधिकारी होते.

मंगलमूर्ती आणि महासाधू मोरया गोसावी यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत. या वेळेला माझी उमेदवारी देखील चतुर्थीला जाहीर झाली, ही देखील मंगलमूर्तींचीच कृपा आहे, असे उद्गार खासदार बारणे यांनी यावेळी काढले.

आमदार उमा खापरे यांच्या निवासस्थानी भेट

भाजप नेत्या व विधान परिषदेचे आमदार उमा खापरे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. उमा खापरे यांनी खासदार बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्या मातोश्री शोभा अमृते तसेच मुलगा जयदीप खापरे व सून जागृती खापरे हेही उपस्थित होते.

माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जयश्री गावडे, वसंत गावडे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजेंद्र गावडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली.

संबळ वादन व पुष्पवृष्टीने स्वागत

चिंचवड- पिंपरी लिंक रोडवरील कालिका माता मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. माजी महापौर अपर्णा डोके यांच्या कार्यालयास बारणे यांनी भेट दिली त्यावेळी संबळ वादन व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी नीलेश डोकेही उपस्थित होते.

त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी आयोजित केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमास बारणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी माजी नगरसेविका कांता मुंडे उपस्थित होत्या. त्या ठिकाणी बारणे यांनी जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. माजी नगरसेवक हनुमंत गावडे यांच्या निवासस्थानी बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.

'विश्वप्रार्थना पसायदान' पुस्तकाचे प्रकाशन

खासदार बारणे यांचे जुने सहकारी दिवंगत उत्तम मारुती कुटे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी आवर्जून ते आकुर्डीला गेले. किसन महाराज चौधरी लिखित 'विश्वप्रार्थना पसायदान' या पुस्तकाचे प्रकाशन बारणे यांच्या हस्ते झाले. शिवशक्ती जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शहराध्यक्ष राजन लाखे, साहित्यिक श्रीकांत चौगुले, सूर्यकांत मुथियान, प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर, रुपेश कुटे, मंगेश कुटे, गणेश कुटे, दिलीप पांढरकर आदी उपस्थित होते.

गांधी पेठ तालमीच्या पैलवानाने राजकीय आखाडाही गाजवला

माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी शिवाजीराव शेडगे व ज्ञानेश्वर शेडगे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. गांधी पेठ तालमीचा हा पैलवान राजकीय आखाडाही गाजवतो आहे, अशी टिपणी पै. ज्ञानेश्‍वर शेडगे यांनी केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे तसेच युवा नेते मधुकर बच्चे, मुकुंद गुरव, माजी नगरसेवक नागेश अगज्ञान व प्रशांत आगज्ञान, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडेकर, माजी नगरसेवक काळूराम पवार व मनीषा पवार, तसेच नामवंत व्यापारी नितीन ठक्कर व राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांचीही खासदार बारणे यांनी भेट घेतली व निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत खासदार बारणे यांच्या चिंचवडमध्ये भेटीगाठी मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत खासदार बारणे यांच्या चिंचवडमध्ये भेटीगाठी Reviewed by ANN news network on ४/११/२०२४ १०:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".