विठ्ठल ममताबादे
उरण : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पद देऊन त्यांना कार्यरत करण्यासाठी तसेच महिलांचा आत्मसन्मान वाढावा, महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं याकरिता उरण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत यांच्या पुढाकाराने रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना शेलघर येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
चिरनेर विभागीय महिला काँग्रेस अध्यक्षा पदी सारिका पाटील, जासई विभागीय महिला काँग्रेस अध्यक्षा पदी विद्या पाटील, उरण तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्षा पदी प्रतिभा पाटील, उरण तालुका महिला काँग्रेस चिटणीस पदी विजया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण तालुका महिला उपाध्यक्षा निर्मला पाटील, जासई विभागीय काँग्रेस अध्यक्ष विनोद पाटील, पागोटे गांव काँग्रेस अध्यक्ष सुजित पाटील आदी उपस्थित होते.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
Reviewed by ANN news network
on
४/१५/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१५/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: