50 हून अधिक धार्मिक संस्था आणि संप्रदाय यांची पथके सहभागी होणार !
पुणे : सनातन संस्थेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे 21 एप्रिलला सायंकाळी 5.00 वाजता महाराणा प्रताप उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक डेक्कन अशी भव्य 'सनातन गौरव दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे.
या गौरव दिंडीमध्ये 50 हून अधिक धार्मिक संस्था आणि संप्रदाय यांची पथके सहभागी होणार आहेत. समस्त हिंदूंनी जात, पक्ष, संप्रदाय विसरून एक सनातन धर्मप्रेमी हिंदू म्हणून या सनातन गौरव दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांनी स्वतःचे बॅनर, पथक, पथसंचलन या माध्यमांतून उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: