रत्नागिरी : कंत्राटी लिपिक म्हणून चिपळूण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणा-या महिलेला त्याच कार्यालयातील लिपिकाने सतत सोशल मीडियावर मेसेज पाठवून त्रास दिला. याची तक्रार गटविकास अधिकारी असलेल्या महिलेकडे केली असता तिने या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी त्या महिलेला नोकरीवरून काढले जाण्याची धमकी दिली. तर उपाभियंता जास्तवेळ थांबवून या महिलेकडून नेमून दिलेल्या कामाऐवजी भलतेच काम करून घेत होते. हे प्रकरण असह्य झाल्यानंतर त्या महिलेने चिपळूण पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्या महिलेला मेसेज पाठविणारा लिपिक, त्या पाठीशी घालणारी गटविकास अधिकारी आणि त्या महिलेला भलतेच काम सांगणारा उपाभियंता यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या प्रकारामुळे चिपळुणासह रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
त्या महिलेला मेसेज पाठविणारा लिपिक
उदय खामकर, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील आणि उपाभियंता अविनाश जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार महिला चिपळूण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी लिपिक म्हणून काम करते. त्या कार्यालयातील लिपिक उदय खामकर सप्टेंबर
महिन्यापासून तिच्या व्हाट्सअपवर सतत मेसेज करत होता. त्याने तिला शिवीगाळही केली
होती असे त्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले असून या प्रकरणी तिने गटविकास
अधिकारी उमा घारगे पाटील यांच्याकडे तकार केली असता त्यांनी या प्रकरणाची
चौकशी करण्याऐवजी त्या महिलेलाच तू तक्रार दिलीस तर तुलाच नोकरीवरून काढले जाईल
असे धमकावून तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. तर उपाभियंता अविनाश जाधव जास्तवेळ
थांबवून नेमून दिलेल्या कामाऐवजी वेगळेच काम देत होते असेही त्या महिलेने तक्रारीत
म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात गटविकास अधिकारी आणि उपाभियंता यांनाही
पोलिसांनी सहआरोपी केले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस
निरीक्षक रविंद्र शिंदे करत आहेत.
हा चिपळुणात सर्वत्र चर्चेचा विषय
झाला असून राज्य महिला आयोगापर्यंत हा प्रकार जाणार असल्याची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: