लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या अॅनिमेटेड ‘बुनी बियर्स' चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित!

 


शेंझेन, चीन : कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करते असते, म्हणूनच जागतिक मदर्स डेचं निमित्त साधून बुनी बियर्स या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाच्या मालिकेचा पुढचा भाग बुनी बियर्स गारडियन्स कोड हा १० मे २०२४ रोजी भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत बुनी बियर्स गारडियन्स कोड’ या चित्रपटाचा नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून सर्व सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये असणाऱ्या धमाल पात्रांना बघितल्यावर चित्रपटात धमाकेदार कथा असून धमाल मजा येणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि यातील प्रसंग भारतातल्या चिमुलकल्यांसोबतच इतर सर्व रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेणार असल्याचं दिसत आहे.स

मदर्स डेचं निमित्त साधून बालकांना जगण्याची चांगली शिकवण देणारा चित्रपट बुनी बियर्स’ प्रदर्शित करताना मनापासून आनंद होत आहे. अशा अनेक नवनवीन अॅनिमेटेड चित्रपटांमधून मनोरंजनासोबतच लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देण्याचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या अॅनिमेटेड ‘बुनी बियर्स' चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित! लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या अॅनिमेटेड ‘बुनी बियर्स' चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित! Reviewed by ANN news network on ४/१६/२०२४ ०८:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".