किसन पाटील यांचे निधन

 


विठ्ठल ममताबादे

उरण : पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,नामवंत हरहुन्नरी कलाकार,उत्कृष्ठ गायक किसन चंदर पाटील यांचे शुक्रवार दि १२ एप्रिल २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  मृत्यू समयी त्यांचे वय ८६ होते. 

त्यांच्या पार्थिवावर वहाळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.  अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी श्री क्षेत्र लांगेश्वर मोरावे येथे तर उत्तरकार्य बुधवार दिनांक  २४ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी वहाळ मध्ये होणार आहे.

किसन पाटील यांच्या पश्चात पत्नी,३ बहिणी,३ मुलं,२मुली, नातू नाती असा परिवार आहे.किसन पाटील यांच्या जाण्याने संपूर्ण उरण व पनवेल तालुक्यात व पाटील परिवार, मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.मनमिळावू, समजूतदार , सर्वांशी प्रेमळ वागणारे असल्याने किसन पाटील यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण उरण व पनवेल तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.एक उत्तम शिकारी, उत्तम गायक, नामवंत हरहुन्नरी कलाकारच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील खूप मोठी हानी झाली आहे. भजन, अभंग आदी धार्मिक गीतांना नवसंजीवनी प्राप्त करून देणारे किसन पाटील आता काळाच्या पडदयाआड गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
किसन पाटील यांचे निधन किसन पाटील यांचे निधन Reviewed by ANN news network on ४/१६/२०२४ ०८:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".