बॉलीवूड कलाकार साहिल खान याला सायबर क्राईम सेलकडून अटक

महादेव ऑनलाईन बेटींग अ‍ॅप स्कॅममध्ये सहभाग असल्याचा आरोप 

 मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता, फिटनेस कोच साहिल खान याला मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेकने २७ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील जगदलपूर येथून अटक केली.

त्याचा देशातील बहुचर्चित बेटिंग अ‍ॅप घोटाळ्याशी संबंध असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात देशाती हजारो नागरिकांची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर साहिल खान याने मुंबई उच्चन्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर साहिल खान अटक टाळण्यासाठी फरार झाला होता. सायबर क्राईम सेलचे पोलीस त्याला अटक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तो सतत राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याला शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, छत्तीसगड असा माग काढत त्याला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून अटक केली.

काही काळापूर्वी महादेव बेटिंग अ‍ॅप व त्यासारखी इतर अनेक ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप अस्तित्वात आली. या अ‍ॅपद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात गोळा होणारा पैसा अनेक आर्थिक संस्थांमध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतविण्यात आला आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये  मध्ये साहिल खान आणि इतर अनेक आरोपींविरुद्ध ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅपमध्ये सहभाग असल्याबद्दल तकार दाखल केली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ॲप प्रवर्तक रवी उप्पल, सौरभ चंद्राकर, शुभम सोनी, अनिल कुमार अग्रवाल आणि इतर १४ जणांची नावे या प्रकरणात आली आहेत. या आरोपींनी व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे थेट सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याची सुविधा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीचा प्राथमिक तपास करताना पोलिसांना या घोटाळ्याची व्याप्ती अतिशय मोठी असल्याचे आढळले.त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या प्रकरणात अटक होण्याची शक्यता दिसून आल्यानंतर साहिल खान याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज  दाखल केला होता. तो फेटाळला गेल्यानंतर तो फरार झाला होता. 

साहिल खान कोण आहे?

स्टाईल आणि एक्सक्यूज मी सारख्या बॉलीवूड चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, खानने सुरुवातीला स्टिरिओ नेशनच्या 'नाचेंगे सारी रात' या संगीतमय व्हिडिओद्वारे प्रसिद्धी मिळवली. नंतर तो फिटनेस कोच म्हणून काम करू लागला.


बॉलीवूड कलाकार साहिल खान याला सायबर क्राईम सेलकडून अटक  बॉलीवूड कलाकार साहिल खान याला सायबर क्राईम सेलकडून अटक Reviewed by ANN news network on ४/२९/२०२४ ०३:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".