तीन लाख रुपयांची लाच मागणा-या तलाठ्यावर गुन्हा दाखल!

 


मुंबई : तीन लाख रुपयांची लाच मागणा-या दिवा येथील तलाठ्यावर अॅन्टीकरप्शन खात्याच्या अधिका-यांनी ८ एप्रिल रोजी  कळवा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

धोंडीबा गोपीनाथ खानसोळे असे या तलाठ्याचे नाव आहे.

या प्रकरणी तक्रार देणा-या व्यक्तीच्या चाळीचे बांधकाम दिवा येथे सुरू आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी तलाठी खानसोळे याने ७ लाख रुपयांची लाच मागितली आहे अशी तक्रार त्या व्यक्तीने अॅन्टीकरप्शन खात्याच्या ठाणे येथील कार्यालयाकडे केली होती. २६ डिसेंबर २०२३ रोजी अधिका-यांनी याची पडताळणी केली असता खानसोळे याने ३ लाख रुपये लाच मागितल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्याच्या विरोधात कळवा पोलीसठाण्यात ७८१/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (संशोधन २०१८) सन १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तीन लाख रुपयांची लाच मागणा-या तलाठ्यावर गुन्हा दाखल! तीन लाख रुपयांची लाच मागणा-या तलाठ्यावर गुन्हा दाखल! Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ ०१:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".