पुणे : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात असलेल्या बिवरी गावामध्ये २ एप्रिल रोजी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा घालून १६ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबवला.
प्रशांत विलास गोते (वय ४०, रा. मु. बिवरी, पो. नायगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोते कुटुंबीय रात्री घरामध्ये झोपले असताना रात्री पावणेदोनच्या सुमारास सातजणांनी त्यांच्या घराचा दरवाजा कटावणीने उघडून घरामध्ये प्रवेश केला.घरातील सर्वांना शस्त्राचा धाक दाखवून कपाटातील पाच लाख रुपये तसेच गोते कुटुंबातील स्त्रियांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तक्रारदाराच्या आईला व बहिणीला मारहाणही केली. लूट करून झाल्यावर दरोडेखोरांनी घरातील सर्वांचे मोबाईल फोन फोडून टाकले. एकूण १६ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.
लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: