केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात शुक्रवारी भाजपा-महायुतीचे नागपूरचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर येथे भाजपा- महायुती उमेदवार व वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मतदान केले. भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार व विद्यमान खासदार सुनील मेंढे तसेच गडचिरोली-चिमूर चे भाजपा- महायुती उमेदवार व विद्यमान खासदार अशोक नेते यांनी ही मतदानाचा हक्क बजावला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ ०९:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: