खोपोलीत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मैदानात

 


खोपोली : मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आता मैदानात उतरले आहेत. "अरे कोण म्हणतंय येणार नायंअरे आल्या शिवाय राहणार नाय" अशा घोषणांनी खोपोलीतील परिसर दणाणून गेला होता. भर उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

खोपोलीतील भाऊ कुंभार चाळ शास्त्रीनगर येथील गणेश मंदिरातून महाविकास आघाडीइंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार सुरुवात केली. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास देशमुखशेतकरी कामगार पक्षाचे कैलास गायकवाडराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटीलमहिला शहरअध्यक्षा सुवर्णा मोरेकॉग्रेस महिला अध्यक्षा  रेखा जाधवतालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचारास मोठ्या संख्येने उपस्थित होते. शास्त्रीनगरक्रांतीनगर आणि काटरंग परिसरात हजारोंच्या संखेने प्रचार रॅलीला सुरुवात झाली.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे म्हणाले की, "प्रचाराचा झंझावात जोरात सुरु आहे. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना खालापूर तालुक्यातून चांगल्या प्रकारे लीड देवू" असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे म्हणाल्या की, "आताच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे. वाढती महागाई झालेली आहे. पेट्रोलगॅस सिलेंडरचे दर तेराशे रुपयांवर गेला आहे. या महागाईला  त्रस्त होवून महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित आहे".

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते रवी रोकडे म्हणाले की, "भारतीय संविधान वाचवण्याचे काम इंडिया आघाडी करणार आहे. या सरकारला कंटाळून देशातील नागरिककार्यकर्ता आज पेटून उठला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात बदल घडणार असून उमेदवार संजोग वाघेरे पाटील प्रचंड मतांनी निवडून येतील त्यासाठी आम्ही निर्धार केला आहे".

 


खोपोलीत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मैदानात खोपोलीत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मैदानात Reviewed by ANN news network on ४/१९/२०२४ ०९:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".