
स्वातंत्र्याचे तारतम्य पाळले पाहिजे : योगिता साळवी
बाबू डिसोजा कुमठेकर
निगडी : निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभागातर्फे 'लव्ह जिहाद; एक ज्वलंत वास्तव' या विषयावर १३ एप्रिल रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई तरुण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या विषयावर सांगोपांग प्रकाश टाकला.बर्याचवेळा लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचा उपभोग घेतल्यानंतर त्यांची देहविक्री केली जाते. किंवा, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात असे सांगून योगिता साळवी म्हणाल्या, भोजन, भजन, भाषा, भूषा, भवन, भ्रमंती. याचे महत्व जाणून प्रतेकाने स्वातंत्र्याचे तारतम्य पाळले पाहिजे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन योगिता साळवी, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे व सहसचिव राजेंद्र देशपांडे, महिला विभागाच्या अध्यक्षा शीतल गोखले व सहकार्याध्यक्षा वैदेही पटवर्धन यांनी केले.
प्रास्ताविक शिल्पा जोशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उन्नती वैद्य यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी पैठणकर यांनी केले.
आभारप्रदर्शन सौ. रश्मी दाते यांनी केले. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Reviewed by ANN news network
on
४/१४/२०२४ ०४:४१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: