30 तोळे सोने जप्त
पुणे : नालासोपारा पालघर येथून येऊन पुण्यात दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली.
मोहम्मद रईस अब्दुल अहद शेख (वय 37, रा. मालवणी, मुंबई) आणि मोहम्मद रिजवान हनिफ शेख (33 वर्षे, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 30 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन असा 20 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद रईस हा सराईत चोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद रिझवानवर सहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
दोघेही चोरी करण्यासाठी मुंबईहून पुण्याला कॅबने येत होते.
23 मार्च रोजी सकाळनगर येथील बाणेर परिसरात भरदिवसा दोन घरात चोरी झाली होती. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे चोरटे दिवसाढवळ्या घरफ़ोडी करतहोते. पुण्यात आल्यावर ते रिक्षा भाड्याने घ्यायचे. रिक्षात बसल्यावर दोघेही 'आम्ही परिसराचा पत्ता विसरलो आहोत, आम्हाला सांगा' असे सांगून त्या भागातील सर्व माहिती ते मिळवत. त्यानंतर ते त्या भागात जाऊन चोरी करायचे. मात्र, चतुश्रृंगी परिसरातील एका घरात चोरी करताना त्यांचे सीसीटीव्ही फ़ुटेज पोलिसांना सापडले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याचा तपास केला. आणि, त्यांना नालासोपारा, पालघर येथून अटक केली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय कुलकर्णी, गुन्हे निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रूपेश चाळके, सुधीर माने, श्रीकांत माने , वाघवले, बाबूलाल तांडेले, किशोर दुशिंग, मारुती केंद्र, श्रीधर शिर्के, विशाल शिर्के, संदीप दुर्गे, फरफान मोमीन, बाबा दांडगे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: