ऊरुळीकांचन येथील प्रकार
पुणे : महावितरणच्या ऊरुळीकांचन उपविभागातील उपकार्यकारी अभियंत्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना ४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
धम्मपाल हौसाजी पंडित वय ५०, असे या उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एका ३१ वर्षांच्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.
तक्रारदार शासकीय नोंदणीकृत ठेकेदार आहे. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील एका व्यक्तीच्या जमिनीतील विजेचे खांब स्थलांतरित करण्याचे काम तकारदाराने घेतले होते. या कामाची मंजुरी देण्याचे अधिकार आरोपी धम्मपाल पंडित याच्याकडे होते. मंजुरीसाठी त्याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत तकार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी सापळा रचला; आणि पैसे घेताना पंडित याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी ऊरुळी कांचन पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
Reviewed by ANN news network
on
३/०६/२०२४ ०८:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: