कोकणातील पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर भर : देवेंद्र फडणवीस

 


देशातला सर्वोत्तम सायबर सिक्युरिटीचा प्लटफार्म राज्यात : देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी :  फारेन्सिकमध्ये राज्याला नंबर वन आणणार. बँका, नान बँकींग फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर, रेग्युलेटर, सोशल साईटस एकाच प्लटफार्मवर असतील, सायबर गुन्हा घडला विशेषतः पैशाच्याबाबतीत फ्राडची घटना घडली की, तासभरात पैसे थाबवून ते परत मिळतील. असा चांगला प्लटफार्म करण्याचे काम सुरु आहे. हा देशातला सर्वोत्तम प्लटफार्म असणार आहे. यातून सायबर सुरक्षा मिळेल. कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

      पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत नुतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी  आमदार प्रमोद जठार, बाळ माने आदी उपस्थित होते.

     उपमुख्यमंत्री श्री फडणविस म्हणाले, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा व भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. फारेन्सिक पुरावा साक्ष म्हणून कसा धरता येईल त्यादृष्टीने कायदा केला आहे. फारेन्सिक क्षमता वाढविण्याचे कामही केले आहे. येत्या ३ ते ४ महिन्यात फारेन्सिकमध्ये राज्याला नंबर वन मध्ये आणणार. न्याय जलद मिळाला पाहिजे, यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे. सायबर सुरक्षा देण्याचे काम होत आहे.    

        कोकणात पायाभूत सुविधा कशा तयार करता येतील, नवीन मिनकं कशी तयार करता येईल, यावर शासनाने मोठा भर दिला आहे.  काजू उत्पादकांसाठी साडेतीनशे कोटी देण्याचा निर्णय केला आहे.

          सर्व सामान्यांचा विचार करणारं आपलं सरकार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बचत गटाचं भांडवल दुप्पट केलं आहे. महिलांच्या हातांना रोजगार देण्याचं काम, त्यांना सक्षम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शक्तीवंदना च्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यातल्या बचत गटांना मिळलेल्या २३५ कोटीमधून महिला अत्यंत वेगाने रोजगारविषयक काम सुरु करतील त्यातून त्या सक्षम होतील. असेही ते म्हणाले.

         सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला. जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम होत आहे. गोव्याच्या धर्तीवर राज्यशासन काजू उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेत आहे.

         पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, श्री फडणवीस अर्थमंत्री असताना प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर केला होता. त्या कामाचे भूमिपूजन आज झाले. याचे लोकार्पण ही आपल्या हस्ते व्हावे. 

रत्नागिरीत जेम्स अँड ज्वेलरी चे प्रशिक्षण केंद्र होत आहे. त्यामधून ३५ हजार ते २ लाखापर्यंत युवकांना मिळणार आहेत. डिफेन्स क्लस्टरचा सामंजस्य करारही रत्नागिरीत करावा असेही ते म्हणाले.

     खासदार श्री. तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्लामाचे स्वागत प्रास्तविक  विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दराडे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस अधीक्षक श्री.  कुलकर्णी यांनी केले.


झालेले सामंजस्य करार

१) जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील व उद्योग विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार प्रती वर्ष ५०० कुशल मनुष्यबळ निर्माण करुन स्थानिकांना जेम्स अँड ज्वेलरी व तत्सम उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे    

    अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रेन आणि  कार्यकारी अध्यक्ष निरव भंसाली यांच्यात करार झाला.

२) टाटा टेक्नाॕलाॕजीस लिमिटेड यांच्यावतीने उपाध्यक्ष सुशीलकुमार आणि उद्योग विभाग, एम आय डी सी च्यावतीने प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांच्यात करार झाला.  प्रतीवर्ष ७ हजार कुशल मनुष्यबळ निर्माण करुन स्थानिकांना उद्योग व विविध व्यवसायांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे

कोकणातील पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर भर : देवेंद्र फडणवीस कोकणातील पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर भर : देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on ३/१५/२०२४ ०८:२०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".