उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

 


रत्नागिरी :  येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन केले.

     याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून), पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,  माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

       नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ९२ कोटी खर्चून इमारत जमिनीखालील तळ मजला, तळमजला अधिक ८ मजले अशी असून इमारतीभोवती आपत्कालीन परिस्थितीत अग्नीशामक वाहन सहजपणे वावरण्याकरिता ९ मी. रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. या इमारतीमध्ये जमिनी खालील तळ मजल्यावर शासकीय ४ चाकी ३५ वाहनांकरिता व १०० दुचाकी वाहनांकरिता वाहनतळ असून, तळ मजल्यावर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या २० वाहनांकरिता वाहनतळाचा समावेश आहे.  

    या इमारतीमध्ये जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासह त्यांच्याशी संलग्न सर्व शाखांची कार्यालये, इतर ५२ शासकीय कार्यालये, ८० आसन क्षमतेचे सर्वसोयींयुक्त ३ समिती कक्ष, ३०० आसन क्षमतेचे जिल्हा नियोजन समिती सभागृह, तळमजल्यावर ८० आसन क्षमतेचे समिती सभागृह, २ नियमित उद्वाहने व १ आपत्कालीन परिस्थितीत वापरावयाचे उद्वाहन यांचा समावेश आहे. इमारतीमध्ये अंतर्भूत कार्यालयांकरिता उपहारगृह, प्रतिक्षालय प्रस्तावित आहेत. इमारतीच्या मागील बाजूस अभ्यांगताच्या १५० वाहनांकरिता वाहनतळ, बागबगीचा व सुशोभिकरण, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प प्रस्तावित आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन Reviewed by ANN news network on ३/१५/२०२४ ०८:२३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".