लोणावळ्यानजिक ब्ल्यूफिल्म निर्मिती सुरू असताना पोलिसांचा छापा; १८ अटकेत!
लोणावळा : लोणावळ्यानजिकच्या मळवली रेल्वेस्टेशननजिक पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या एका बंगल्यात ब्ल्यूफिल्मचे शुटींग सुरू असल्याची माहिती २९ मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलीसस्टेशनचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. पोलिसांती तात्काळ या बंगल्यावर छापा घातला. त्यावेळी तेथे ब्ल्यूफिल्मचे शुटींग सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणात गुंतलेल्या ५ महिला १० पुरुष आणि बंगला भाड्याने देणार्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ब्ल्यूफिल्म तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन कॅमेरे, लाईटस, माईक, लॅपटॉप असा सुमारे ६ लाख ७२ हजार६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाटण गावाच्या हद्दीतील अर्णव व्हिला या बंगल्यात हा ब्ल्यूफिल्म निर्मितीचा उद्योग सुरू होता.
पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली.त्यावरून विष्णू मुन्नासाहब साओ (वय ३० वर्षे, रा.परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय ३५ वर्षे, रा.बस्ती, उत्तरप्रदेश), अलकाराज के राजन (वय २३ वर्षे, रा.रंगपुरी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय ३८ वर्षे, रा.मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासू गुप्ता (वय २१ वर्षे, रा.दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय २९वर्षे, रा. चंद्रपूर), समीर मेहताब आलम (वय २६ वर्षे, रा. अमरोहा, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेश चौबे (वय २९ वर्षे, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१ वर्षे, रा. रौनक सिटी, हरियाणा), विणा भारत पोवळे (वय ३२ वर्षे, रा. खोपट, ठाणे), मेहनाज जाहीद हुसेन खान (वय २८ वर्षे, रा.नालासोपारा वेस्ट, पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८ वर्षे, रा. वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९ वर्षे, सुरत, गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१ वर्षे, रा.डेहराडून) आणि मनीष हिरामण चौधरी (वय २० वर्षे, रा.शास्त्रीनगर, हरीयाणा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील 13 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर बंगला भाड्याने देणार्या सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२ वर्षे) आकेश गौतम शिंदे (वय ३२ वर्षे) व सनी विलास शेडगे (वय ३५ वर्षे, सर्व रा.मळवली, ता. मावळ, जि. पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे.
या सर्वांवर भारतीय दंडविधान कलम 292,293,34., माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67,67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपण अधिनियम 1986 कायदा कलम 3,4,6,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे सहायक अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर धुमाळ उपनिरीक्षक भारत भोसले, सागर अरगडे,सहायक उपनिरीक्षक अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, युवराज बनसोडे, हवालदार बाळकृष्ण भोईर, दुर्गा जाधव, पुष्पा घुगे, नाईक रुपाली पोहीनकर, कॉन्स्टेबल सागर धनवे, सूरज गायकवाड यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/३०/२०२४ ०२:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: