पुणे : डीईएसच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गीता धनावडे हिची इस्रो प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
इस्रोच्या 'युविका 2024' या कार्यक्रमाअंतर्गत ही निवड करण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गीताने संपूर्ण देशात सहावा क्रमांक पटकाविला.
अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (एसएसी) येथे 12 ते 24 मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी गीताच्या यशाबद्दल तिचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.
गीताने राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात विजेतेपद मिळविले असून, राज्यस्तरीय ऑलिंम्पियाड स्पर्धेत ही विजेतेपद प्राप्त केले. गीताने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजेती आहे.
गीता धनावडे या विद्यार्थिनीची इस्रो प्रशिक्षणासाठी निवड
Reviewed by ANN news network
on
३/३०/२०२४ ०१:३८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/३०/२०२४ ०१:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: