विठ्ठल ममताबादे
उरण: जायंट्स् ग्रुप ऑफ उरण २०२४ चा पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता उरणमधील भोईर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे एन. सी. एफ उपेंद्र मेनन सेंन्ट्रल कमिटी मेंबर्स जी. डब्ल्यू एफ, एन. सी. एफ ललिता वासन सेंन्ट्रल कमिटी मेंबर्स जी डब्ल्यू एफ, त्याचबरोबर प्रमुख मान्यवर म्हणून जी. टी. आनंद राय किणी,एन.सी.एफ ए. एस. महादेवन अध्यक्ष, एन. सी. एफ इ. आर सतीश अलगुर आय पी. पी. फेडरेशन १ बी.पी. अध्यक्ष, जी. टी. रोशनलाल मेहता कमिटी मेंबर्स, अध्यक्ष विनायक पै, सेक्रेटरी चेतन ठक्कर, आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या स्वागतानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. जायंट्सच्या प्रार्थनेनंतर मान्यवरांच्या परिचयानंतर मिटींग ची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीस २०२३ चे अध्यक्ष विनायक पै यांचे स्वागतपर भाषण झाले. चेतन ठक्कर यांनी २०२३ चा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर नव्याने आलेले जायंट्स् मेंबर्स तृप्ती भोईर, नचिकेत ढेरे, अभिषेक जैन यांना शपथविधी अधिकारी म्हणून प्रियवंदा तांबोटकर मॅडम युनिट डायरेक्टर फेडरेशन १ बी यांच्याकडून सर्व टिमला शपथ देण्यात आली व त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर २०२४ नवीन वर्षाच्या जायंट्स् अध्यक्षा संगिता ढेरे यांची नियुक्ती व त्यांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात येऊन त्यांना पदभार देण्यात आला. नवीन पदभार घेतलेल्या अध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर ,आलेल्या सर्व मान्यवरांनीही आपल्या या समाजाविषयी बांधिलकी जपण्यासाठी, समाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगून आपले मत आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले.
सर्व जायंट्स् मेंबर्स ना आपापल्या कामात सत्यता ,प्रामाणिक पणा व कामात निष्ठा, सात्यतता याविषयी विश्वास देण्यात आला.
जायंट्स् मेंबर्स च्या या कार्यक्रमात अतिशय खेळीमेळीचे व आनंदी वातावरण निर्माण झाले होते, एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मान्यवर, सर्व जायंट्स् मेंबर्स यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
या सुंदर कार्यक्रमास रंगत आणली ती आपल्या सुंदर भाषाशैलीत सुत्रसंचालन केले ते आनंद ठक्कर, तर चैताली ठक्कर यांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जायंट्सचे दक्षता पराडकर, प्रतिभा भालेराव, मनिषा घरत, मोनिका ठक्कर, देवेंद्र पिंपळे, योगेश म्हात्रे,राजेश तलरेजा, सचिन ढेरे, आदी सदस्य उपस्थित होते.
जायंट्स ग्रूप उरण २०२४ चा पदग्रहण सोहळा जल्लोषात साजरा
Reviewed by ANN news network
on
३/२५/२०२४ १२:१४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: