दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स(डिक्की) च्या 'व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' ला चांगला प्रतिसाद



जागतिक महिलादिनानिमित्त उपक्रम


पुणे : दलित इंडियन  चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की)च्या महिला आघाडीतर्फे   जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित  'व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम'  उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला .हॉटेल लेमन ट्री,कॅनॉट रोड,पुणे येथे ८ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन झाले.सिडबी,बँक ऑफ महाराष्ट्र आणि नॅशनल एससी -एसटी हब च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे,आरती कांबळे,नेत्रा पाटकर,मीरा बोरा,रोहिणी डेंगळे यांना 'वूमन अचिव्हर्स अवॉर्ड २०२४' प्रदान करण्यात आले.सार्वजनिक क्षेत्रातील विविध  सरकारी  १४ कंपन्या, तसेच टाटा मोटर्स या खासगी क्षेत्रातील कंपनीचे प्रतिनिधी मार्गदर्शन करण्यासाठीं उपस्थित होते.

 एमएनजीएल च्या संचालक बागेश्री मंठाळकर,बेलराईज इंडस्ट्रीजच्या संचालक सुप्रिया बडवे, दलित इंडियन  चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक  पद्मश्री मिलिंद कांबळे,सिडबी पुणे चे सह सरव्यवस्थापक दीपक राय, बँक ऑफ महाराष्ट्र चे सरव्यवस्थापक दिनकर संकपाळ,डिक्की महिला आघाडीच्या मार्गदर्शक सीमा कांबळे, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स चे कार्यकारी संचालक निरंजन सोनप, एससी -एसटी हब,पुणे चे प्रमुख रितेश रंगारी, मुकुंद कमलाकर, राजेन्द्र साळवे, अविनाश जगताप, संतोष कांबळे, चित्रा उबाळे, निवेदिता कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.सीमा कांबळे यांनी प्रास्ताविक केले, मैत्रेयी कांबळे यांनी सूत्र संचालन केले. निवेदिता कांबळे यांनी आभार मानले.

'व्यवसायासाठी सर्व आवश्यक गुण महिलांमध्ये असतात. मात्र,महिलांनी परंपरागत व्यवसाय पुरते मर्यादित न राहता उद्योजकतेची नवी क्षेत्रे पादाक्रांत करावीत, व्यवसायात शिरताना 'करो या मरो ' या जिद्दीने उतरले पाहिजे. स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, 'असे आवाहन बागेश्री मंठाळकर यांनी केले.

'महिला विकसित झाली तरच देश विकसित होणार आहे. महिला उद्योजिकाना सरकारी कंपन्यांमध्ये  कसे काम करता येईल याचे मार्गदर्शन   महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले', असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.  'महिलांनी प्रगतीची, उद्योजकतेची उदाहरणे समोर ठेवावी', असे आवाहन सुप्रिया बडवे यांनी केले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स(डिक्की) च्या 'व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' ला चांगला प्रतिसाद  दलित इंडियन  चेंबर ऑफ कॉमर्स(डिक्की) च्या 'व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' ला चांगला प्रतिसाद Reviewed by ANN news network on ३/०८/२०२४ ०९:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".