विठ्ठल ममताबादे
उरण : उरण शहरातील आनंद नगर येथे दरवर्षी होळी सण मोठया उत्साहात साजरी केली जाते. याहीवर्षी हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.आनंद नगर होळी उत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा प्रतिष्ठेचा आनंद नगर भूषण पुरस्कार यावेळी हरिभक्त परायण गोविंद घरत महाराज यांना देण्यात आला.
स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देऊन आनंद नगरचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, सेक्रेटरी पत्रकार शेखर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोविंद महाराज यांनी आजपर्यंत ५४ वर्ष भजन कीर्तन दिंडी पदयात्रा केली आहे. ते उरण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. त्यांना रायगड भूषण पुरस्कार , ज्ञानगंगा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.गोविंद घरत महाराज यांच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.यामुळे पुरस्काराचा मान वाढल्याचे पत्रकार शेखर पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . यावेळी माजी नगरसेविका लता पाटील, दीपिका ठाकूर, पुष्पा म्हात्रे ,आनंदनगरचे रहिवासी उपस्थित होते .
ह. भ. प. गोविंद घरत महाराज आनंदनगर भूषण पुरस्काराने सन्मानित
Reviewed by ANN news network
on
३/२५/२०२४ ०९:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: