विठ्ठल ममताबादे
उरण :सामाजिक कार्यकर्ते तथा केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य राजू मुंबईकर यांनी रानसई येथील सर्व आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां होळीच्या सणा निमित्त प्रेमाची भेट देऊन त्यांना भरल्या मनाने शुभेच्छा देखील दिल्या.
त्यांच्या सोबत ह्या आनंददायी रंगोत्सवाच्या क्षणी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक स्नेहल पालकर,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्रजी पाटील,आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत व केअर ऑफ नेचर संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
होळी सणाच्या निमित्ताने राजू मुंबईकर यांनी या आदिवासीं बांधवां करिता दिलेली ही प्रेमाची आणि आपुलकीची भेंट मिळाल्यावर त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील ते आपुलकीचे निरागस आनंदी भाव पाहून खरचं होळी सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आणि होळीच्या भावनिक रंगात न्हाऊन गेला.असंच म्हणावे लागेल.
होळीनिमित्त आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप
Reviewed by ANN news network
on
३/२५/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: