कोपाची ‘ईस्टर एग-व्हेंचर’ ठरणार शहरातली सर्वात कूल ईस्टर पार्टी

 


 

पुणे : कोपा हे कोरेगाव पार्कमध्ये वसलेले पुण्यातील आघाडीच्या प्रीमियर लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन पुण्यातली सर्वात कूल ईस्टर पार्टी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. हा धमाकेदार ईस्टर एग- व्हेंचर २९ ते ३१ मार्च दरम्यान दुपारी १२ ते रात्री ९ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

 

लहान मुले व त्यांच्या परिवाराला सहभागी होऊन अविस्मरणीय आठवणी तयार करता येतील असे बरेच उपक्रम यात आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात कल्पनाशक्तीला दाद देणारेवेगवेगळ्या प्रकारचे आनंददायी अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.



लहान मुलांना ईस्टर बनीसोबत फोटो काढून घेता येईल व त्यानंतर त्यांच्या लाडक्या बनीसोबत धमाल डान्स करता येईल. सर्जनशील मुलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे खास आयोजन करण्यात आले असून त्यात एग पेटिंग
कुकी सजवणेफ्रीज मॅग्नेट तयार करणे यांचा समावेश आहे. हा आनंद आणखी वाढवण्यासाठी लाइव्ह टॅटू आर्टिस्टही सज्ज असणार असून त्यामुळे हव्या त्या टॅटूचा आनंद घेता येणार आहे.


ईस्टरचा उत्सव एग हंटशिवाय अपूर्ण असतो हे लक्षात घेऊन सहभागींसाठी थरारक हंट आयोजित करण्यात आला आहे. त्याशिवाय सर्व वयोगटाच्या मुलांना गुंतवून ठेवणारे भरपूर मनोरंजक गेम्स दिवसभर घेतले जाणार आहेत. अतिशय कमी खर्चात कोपामध्ये ईस्टरची जादू आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

कोपाची ‘ईस्टर एग-व्हेंचर’ ठरणार शहरातली सर्वात कूल ईस्टर पार्टी कोपाची ‘ईस्टर एग-व्हेंचर’ ठरणार शहरातली सर्वात कूल ईस्टर पार्टी Reviewed by ANN news network on ३/२६/२०२४ ०९:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".