देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

 


मुंबई : राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ एक्सवर अपलोड करणार्‍या किंचक नवले याची सांताक्रूझ पोलिसांनी शनिवारी सातार्‍यातील सदरबाजार परिसरातून उचलबांगडी केली.

न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीसकोठडी दिली आहे.

शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांताक्रूझ पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सांताक्रूझ पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “सातारा येथील किंचक नवले नावाच्या ३४ वर्षीय व्यक्तीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जीवघेणी आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याआधी गुरुवारी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही अटक करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड Reviewed by ANN news network on ३/०३/२०२४ १२:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".