पुणे :सेंट्रल रेल्वेने पुणे ते अमरावती दरम्यान आठवड्यातून दोनदा नवीन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यानी दिली. या ट्रेनचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ११४०५ पुणे- अमरावती द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस 10.03.2024 पासून दर शुक्रवारी आणि सोमवारी 22.45 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता अमरावतीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ११४०६ अमरावती - पुणे द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस अमरावतीहून दर शनिवारी आणि सोमवारी १९.५० वाजता सुटेल आणि ०९.०३.२०२४ पासून पुण्याला पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२५ वाजता पुण्याला पोहोचेल.
य गाड्या उरुळी, केडगाव, दौंड, जिंती रोड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा स्थानकावर थांबणार आहेत.
गाडीला एकूण 17 ICF डबे असणार आहेत. त्यामध्ये एक फर्स्ट एसी, एक एसी-2 टियर, दोन एसी-3 टियर, 5 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन लगेज ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे.
ट्रेन क्रमांक 11405/11406 साठीचे आरक्षण 09.03.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२४ ०१:१९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: