माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍यास हातकड्या

येरवडा येथील प्रकार

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या क्रिएटीसिटी मॉलमधील फर्निचर कंपनीच्या कर्मचार्‍यांना धमकावत दरमहा १८ हजार रुपये खंडणीची मागणी करत कंपनीतील साफसफाई आणि मजुरीच्या कामाचे कंत्राट मागणार्‍या एकाला पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

शेखर मारुती लोंढे वय ३७ वर्षे, रा. नागपूरचाळ, पोलीस चौकी समोर, येरवडा पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे.

त्याने क्रिएटीसिटी मॉलमधील वुडन स्ट्रीट फर्निचर प्रा. लि. या कंपनीचे फर्निचर घेऊन आलेल्या ट्रकमधील फर्निचर उतरवू देण्यास आडकाठी केली होती. आम्ही येथील स्थानिक आहोत असे सांगून आरोपीने दरमहा १८ हजार रुपये व कंपनीतील साफसफाई आणि मजुरीच्या कामाचे कंत्राट मागितले. न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याची तक्रार खंडणीविरोधी पथकाकडे आली असता त्याची चौकशी पथकाने केली. त्यावेळी आरोपीचा माथाडी संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचे तसेच त्याची माथाडी बोर्डाकडे नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले. या घटनेपूर्वीही त्याने तक्रारदाराला धमकावून १२ हजार रुपये खंडणी उकळली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

येरवडा पोलीसठाण्यात आरोपीविरोधात १२७/२०२४ क्रमांकाने आणि भा.दं.वि. कलम ३८६,३८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी  पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त, प्रवीण पवार, अपर आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपआयुक्त (गुन्हे)अमोल झेंडे, सहायक आयुक्त, गुन्हे-२ सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा,  निरीक्षक श्री प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन चव्हाण, चेतन शिरोळकर यांनी केली.

माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍यास हातकड्या  माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍यास हातकड्या Reviewed by ANN news network on ३/०६/२०२४ ०८:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".