अट्टल घरफोड्याला वानवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील वानवडी पोलिसांनी एका अट्टल घरफोड्याला अटक केली असून त्याच्याकडून ६ लाख ७९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोराच्या अटकेमुळे वानवडी पोलीसठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०३, निहाल हाईटस, सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे असे या चोराचे नाव आहे. वानवडी पोलीसठाण्याच्या हद्दीत ११ फेब्रुवारी रोजी एक घरफोडी झाली होती. यामध्ये २ लाख ३३ हजार ५५० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यातील चोर हा रेयान शेख असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वानवडी पोलीसठाण्याच्या हद्दीत तीन चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून  ६ लाख ७९ हजार २५० रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, पुणे आर राजा,सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक संजय पतंगे, निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, अंमलदार हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली.

अट्टल घरफोड्याला वानवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या  अट्टल घरफोड्याला वानवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या Reviewed by ANN news network on ३/२८/२०२४ ०८:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".