मुंबई : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली.
आज मंत्रालयात राज्य माहिती आयुक्तपदांच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजगोपाल देवरा, नितीन गद्रे, माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांची उपस्थिती होती.
तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी
Reviewed by ANN news network
on
३/०७/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/०७/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: