चाकण पोलिसांची कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील चाकण पोलीसठाण्याच्या पथकाने ७ मार्च रोजी एका सराईत मोटारसारकलचोराला अटक करून त्याच्याकडून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामुळे चाकण येथील २ आणि देहुरोड व म्हाळुंगे येथील प्रत्येकी १ मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ओंकार अरविंद पांडे, वय २० वर्षे, रा चव्हाण नगर, तळवडे, पुणे असे या चोराचे नाव आहे.
चाकण परिसरात मोटारसायकली चोरीचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे पोलीस चोराचा शोध घेत होते. ४ मार्च रोजी पोलिसांना या चोराबद्दल माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, अपर आयुक्त, वसंत परदेशी, उप आयुक्त, परिमंडळ - ३ डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. एस. नरके तसेच तपास पथकाचे सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, उप निरीक्षक नामदेव तलवाडे, सहायक फ़ौजदार सुरेश हिंगे, हवालदार राजू जाधव, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, मनोज साबळे, भैरोबा यादव, कॉ्न्स्टेबल रमेश कांबळे, संतोष फटांगरे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, सुनिल भागवत, महिला शिपाई माधुरी कचाटे यांनी केली .
Reviewed by ANN news network
on
३/०७/२०२४ ०९:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: