मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१, नागपूर ६२, भंडारा- गोंदिया ४९, गडचिरोली- चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
राज्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल
Reviewed by ANN news network
on
३/२७/२०२४ १०:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: