न्याय आणि हक्कासाठी लढत आहोत :लोकसेना पक्षाची भूमिका
पुणे : 'लोकसेना हा पक्ष लोकसभा निवडणूकीसाठी राज्याच्या ४८ जागेपैकी दहा जागांवर उमेदवार निवडणूक मैदानात उतरवणार आहे .पुणे लोकसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते आणि इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे ',अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार(बीड) यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. असलम इसाक बागवान,कबीर शेख, बशीर सय्यद, दादासाहेब गायकवाड हेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
'गोर गरीब आणि सामान्य जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहोत.प्रस्थापित पक्ष हे प्रश्न सोडवू न शकल्याने सामान्यांचा आवाज बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणूक हे माध्यम निवडले आहे,अशी भूमिका लोकसेना पक्षाचे प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी मांडली. राजकीय पक्षांनी मुस्लीम समाजाकडे फक्त व्होट बँक म्हणून पाहू नये, राज्यात ४८ पैकी १० जागा मुस्लीम उमेदवारांना द्यायला हव्या होत्या. मुस्लीम आरक्षण, हिंसाचार, अल्पसंख्य संरक्षण कायदा, शिक्षणा चा दर्जा उंचावणे, बार्टी सारखी संस्था मुस्लीम समाजाच्या उच्च शिक्षणा साठी स्थापन करण्यात याव्या , अशा आमच्या मागण्या आहेत, असे अॅड. इलीयास इनामदार यांनी सांगीतले.
प्रत्येक पक्ष अल्पसंख्यक समुदायाचे खच्चीकरण करण्यासाठी कार्यरत आहे,असे दिसून येते.कोणत्याही प्रस्थापित पक्षाने अल्पसंख्यकांना उमेदवाऱ्या दिल्या नाहीत.मते मागायला मात्र सर्व पक्ष येत असतात. अल्पसंख्यकांना मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा सर्व पक्ष करतात,मात्र जर निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व दिले नाही तर अल्पसंख्यक समुदाय मुख्य प्रवाहात आणणे कसे शक्य होईल ,काँग्रेस ने आजवर आम्हाला रडवले आणि भाजपने धमकावून कारभार केला ,असे प्रतिपादन असलम बागवान यांनी या पत्रकार परिषदेत केले.अल्पसंख्य,बहुजन आणि दलित यांचा विकास थांबला आहे ,या घटकांना न्याय द्यायची आमची इच्छा आहे ,असेही बागवान यांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघात दोन वर्षे विकास थांबला आहे.निवडणूक घेतली गेली नाही.मी समाजकारणाला प्राधान्य दिलेले आहे.असे बागवान यांनी सांगितले. क्षेत्र सभेसाठी उपोषण केले.संकल्पना फलकाविरुद्ध लढा दिला. इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपच्या माध्यमातुन पुण्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे.अनेक सामाजिक आंदोलन केलेली आहेत.धोरणात्मक मुद्यांवर कार्य ,सी ए ए विरूद्ध पुर्ण भारत दौरा ,पंचायत राज करीता १२०० किमी पोचमपल्ली तेलंगणा ते वर्धा पदयात्रा, पुणे ते मुंबई ३ वेळा सी एए, मुस्लिम आरक्षण, किसान कायदे विरूद्ध पदयात्रा,मौलिक आधिकार करीता पुणे ते दिल्ली सायकल यात्रा अशा अनेक सामाजिक आंदोलनात माझे योगदान आहे.कोंढवा भागातील नागरी प्रश्नांसाठीही त्यांनी लढे दिलेले आहेत,असेही ते म्हणाले. पदयात्रा आणि सायकल द्वारे प्रचार करणार, आचार संहिता उल्लंघन करणार नाही, असेही बागवान यांनी सांगितले
बागवान यांचे सामाजिक कार्य पाहून लोकसेनाने त्यांना पुणे येथून उमेदवारी दिली आहे व उर्वरित मतदार संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा लवकरच करणार आहोत,अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली .
Reviewed by ANN news network
on
३/२८/२०२४ ०१:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: