खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पाठलाग करून पकडले



चंदननगर पोलिसांची कामगिरी

पुणे : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या एका फरार आरोपीला पकडण्यात पुण्यातील चंदननगर पोलिसांना यश आले आहे.

संजय कारभारी शिंदे, वय ३२ वर्षे, राहणार घर नं. ५, सागर पार्क, टाटागार्डन चौकाजवळ, वडगावशेरी,  पुणे असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

त्याच्यावर चंदननगर पोलीसठाण्यात ४९३/२०२३ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०७,४९८,(अ), ३२३, ५०४, ५०६, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(३)(१),सह १३५ तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४ तसेच क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

आरोपी फरार झालेला असल्यामुळे चंदननगर पोलीसठाणे त्याचा शोध घेत होते. हा आरोपी अण्णापूर, शिरूर येथे एका शेतातील उसाच्या फडात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांचे एक पथक तेथे गेले. त्यांनी शेताबाहेर दबा धरून बसत आरोपी बाहेर पडण्याची वाट पाहण्यास सुरुवात केली. तो बाहेर येताच त्याला बाहेर पोलीस असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने पळण्यास सुरुवात केली. पोलीसपथकाने पाठलाग करून त्याला पकडले.

पुढील तपास चंदननगर पोलीसठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.

ही कामगिरी अपर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर  मनोज पाटील,  उपआयुक्त,परिमंडळ ४  विक्रांत देशमुख,  सहायक आयुक्त, येरवडा विभाग  संजय पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  वरीष्ठ निरीक्षक, चंदननगर  मनीषा पाटील,  उपनिरीक्षक तानाजी शेगर,  अंमलदार अविनाश संकपाळ, गणेश हांडगर, शेखर शिंदे,श्रीकांत कोद्रे,सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, श्रीकांत शेंडे, विष्णु गोणे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे,शिवाजी धांडे, ज्ञानोबा लहाने, यांनी केली.

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पाठलाग करून पकडले  खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पाठलाग करून पकडले Reviewed by ANN news network on ३/०९/२०२४ ०४:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".