भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित 'झिंग चिक झिंग' चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती!

 


मुंबई: अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे 'झिंग चिक झिंग' या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर  प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी कमालीचा प्रतिसाद मिळत आहे.

एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला हा शेतकरी आपला संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसला असून जगासमोर मान उंच करून चालणं त्याच्यासाठी लज्जास्पद झालं आहे. हा अगतिक शेतकरी कर्जाचा डोंगर फोडून काढेल की त्याखाली दबून मरेल, हे चित्रपटात कळणार आहे. नितीन नंदन यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव,  माधवी जुवेकर, संजय मोने,उदय सबनीस, चिन्मय कांबळी, आरती मोरे आणि दिलीप प्रभावळकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.

“२०१० च्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच आणखी बऱ्याच पुरस्कारांनी पुरस्कृत झालेला चित्रपट अल्ट्रा झकासच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आनंद गगनात न मावणारा आहे. अशाच प्रकारचे अनेक चित्रपट आणून प्रेक्षकांना नेहमी मनोरंजित ठेवण्याचा आमचा सकारात्मक अट्टहास आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित 'झिंग चिक झिंग' चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती! भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित 'झिंग चिक झिंग' चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती! Reviewed by ANN news network on ३/०५/२०२४ ०६:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".