मुंबई : मुंबईतील मानखुर्द पोलीसठाण्याच्या हद्दीत ९ फेब्रुवारी रोजी चार दाखलेबाज गुन्हेगारांनी एका व्यक्तीस ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मानखुर्द पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एक आरोपी फरार झाला होता. तो गुजराथ, राजस्थान मार्गे दिल्लीत जाऊन लपून बसला होता. पोलिसांनी त्याचा माग काढत दिल्ली येथे जाऊन त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील मानखुर्द पोलीसठाण्यात अशपाक खान उर्फ बब्बू, राशीद जग्गा, फैसल सिध्दीकी उर्फ नागौरी व इस्माईल शेख यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम ३०७,५०४,५०६(२),३४ शस्त्र अधिनियम कलम ४,२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ), १३५ अन्वये गुन्हा दाखल होता. या आरोपींपैकी फैसल उनहुलहक सिध्दीकी उर्फ नागोरी हा फरार झाला होता.तो गुजराथ, राजस्थान मार्गे दिल्लीत जाऊन लपून बसला होता.त्याचा शोध लावण्यासाठी परिमंडळस्तरावर पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने त्याचा शोध लावून त्याला दिल्लीमधून अटक करण्यात यश मिळविले.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ११ मार्च पर्यंत पोलीसकोठडी देण्यात आली.
हा आरोपी पोलिसदप्तरातील दाखलेबाज गुन्हेगार असून त्याच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी देणे, घातक हत्यारांनी हल्ला करणे, दंगा करणे, गृहअतिक्रमण करणे, भेसळ करणे, अपायकारक पदार्थांची विक्री करणे असे गुन्हे दाखल आहेत.
या गुन्हयाचा पुढील तपास ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत शिंदे करीत आहेत.
ही कामगिरी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, उपआयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद नाणेकर, विजयसिंह देशमुख, अजय गोल्हार, अभय काकड,राजू साळुंखे,सहायक फौजदार रमेश धुमाळ, संतोष कांबळे, हवालदार सुनील पाटील, प्रमोद लेंभे, समीर पिंजारी, शिपाई प्रदिप देशमुख यांनी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ १२:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: