पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने सांगवी येथे १८ मार्च रोजी अमलीपदार्थ विकणार्या ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७ किलो २०० ग्रॅम गांजा, १७५ ग्रॅम चरस १ कार आणि ३ दुचाकी वाहने असा २० लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओंकार ऊर्फ सोन्या महादेव लिंगे, वय २६ वर्षे, अनिकेत अनिल गोडांबे, वय २५ वर्षे, रोहन उत्तम कांबळे, वय २१ वर्षे, रुपेश गौतम जाधव, वय २१ वर्षे, रोहन ऊर्फ पप्या महादेव लिंगे, वय २४ वर्षे, सर्व राहणार पी. डब्ल्यू. डी. कॉलनी, दापोडी, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर आयुक्त, वसंत परदेशी, उपआयुक्त, गुन्हे, संदीप डोईफोडे,सहाय्यक आयुक्त, गुन्हे - १, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सचिन कदम,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक, सहायक फौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, प्रदीप शेलार, हवालदार राजेंद्र बांबळे, संतोष दिघे, मयुर वाडकर, नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, दादा धस, सदानंद रुद्राक्षे, कपिलेश इगवे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: