कोंढवा पोलीस आणि सेना गुप्तवार्ता पथकाची संयुक्त कारवाई
पुणे : सेनादलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या एका ठकसेनाला कोंढवा पोलीस आणि सेना गुप्तवार्ता पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे
विनायक तुकाराम कडाळे असे त्याचे नाव आहे. तो पूर्वी सेनादलाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये रोखपाल म्हणून नोकरी करत होता. त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
त्याने अनेकांना सेनादलात नोकरी लावतो असे सांगून अनेकांकडून पैसे उकळले. त्यानंतर तो आपले राहते ठिकाण बदलून अन्यत्र राहण्यास गेला. त्याच्याविरोधात एका व्यक्तीने कोंढवा पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांकडून कडाळे याने १३ लाख ५० हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीसठाण्यात ८४/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासकामी कोंढ्वा पोलिसांनी सेना गुप्तवार्ता पथकाची मदत घेतली. त्यानंतर आरोपी लुल्लानगर चौकातील सपना पावभाजी सेंटर जवळील हिलव्ह्यू सोसायटीमध्ये राहत असून तो घराबाहेर पडताना तोंडाला कपडा बांधून बाहेर पडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने इतरही काहीजणांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.
ही कामगिरी अपर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, उपआयुक्त परि.०५ पुणे आर. राजा, सहायक आयुक्त गणेश इंगळे, कोंढवा पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे, शशांक खाडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा