निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

 


रत्नागिरी : निवडणुकीच्या काळात  होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष पुणे आयकर विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस दिवसाचे 24 तास,(24x7) कार्यरत असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

      2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती / तक्रारी देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक, ईमेल किंवा पत्ता 

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0353 

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0354

व्हॉट्सॲप क्रमांक : 9420244984

ईमेल आयडी : pune.pdit.inv@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता : रूम क्र. 829, 8वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे 411037. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर,या  जिल्ह्यांसाठी हा कक्ष आहे. 

          नागरिकांनी दक्ष राहून माहिती कळवावी, यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आयकर विभागाला मदत होईल, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.

निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह Reviewed by ANN news network on ३/१९/२०२४ ०७:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".