आदर्श आचारसंहिता उल्लंघन तक्रारींसाठी सी-व्हिजिल ॲप

 


100 मिनिटात होणार तक्रारीचे निवारण

रत्नागिरी  : सीटीजन ॲप अर्थात सी-व्हीजील हे प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्मार्ट फोनचा वापर करुन फोटो, ऑडीओ किंवा व्हीडीओ क्लीक करण्याचा अधिकारी देऊन आदर्श आचारसंहितेचा तसेच खर्चाच्या उल्लघंनाचा पुरावा प्रदान करतो. तक्रार प्राप्त होताच 100 मिनीटात त्याचे निवारण होणार आहे. त्यासाठी  जिल्हास्तरावर 24 X 7 जिल्हा नियंत्रण कक्ष आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर तात्काळ कार्यान्वित करण्यात आला आहे.

    भारत निवडणूक आयोगाच्या https://cvigil.eci.gov.in वरुन डॉऊनलोड करावे अथवा गुगल प्ले स्टोअर अथवा ॲप स्टोअरमधून सी व्हीजील ॲप डाऊनलोड करावे.      

       यावर नागरिकांना चित्रात्मक, ऑडीओ आणि व्हीडीओ पुरावे देता येतात. जीआयएस आधारित आॕटो ट्रॅकींग, मजबूत आणि त्वरित प्रतिसाद प्रणाली, केलेल्या कारवाईबद्दल प्रतिसाद मिळवा, जलद आणि अचूक रिपोर्टींग, आचारसंहिता उल्लंघनाचा थेट अहवाल द्या, पूर्व रेकॉर्ड केलेल्या प्रतिमा आणि व्हीडीओंना परवानगी देत नाही, ही याची वैशिष्ट्ये आहेत. 

नागरिकांची तक्रार प्राप्त होताच नियंत्रण कक्षात ती दिसते. त्यानंतर ती तक्रार एफएसटी अर्थात फिरते निगरानी पथकाकडे पाठविली जाते. त्यानंतर घटनास्थळी एफएसटी पथक भेट देते. त्याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केला जातो. निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेतात.   

      लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात याबाबतचे नियंत्रण कक्ष स्थापन झाले आहे. 

       तक्रार दाखल करण्यासाठी एमएमसी/ खर्च उल्लघंन घटनेचा फोटो किंवा व्हिडीओ घेतल्यानंतर त्याचे पूर्वावलोकन, फ्लाईंग स्कॉडद्वारे अचूक स्थान ओळखण्यास मदत करण्यासाठी अतिरिक्त माहिती प्रविष्ट करा. तक्रारीचे स्वरुप निवडा. दिलेल्या जागेत घटनेचे अचूक वर्णन प्रविष्ट करा. अनिवार्य फिल्डमध्ये प्रवेश केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

आदर्श आचारसंहिता उल्लंघन तक्रारींसाठी सी-व्हिजिल ॲप आदर्श आचारसंहिता उल्लंघन तक्रारींसाठी सी-व्हिजिल ॲप Reviewed by ANN news network on ३/१९/२०२४ ०७:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".