खेड: शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत गोव्यातील मडगाव येथून दोन्ही अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेतले. या दोन्ही अल्पवयीन शाळकरी मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ व १३ वयोगटातील दोन शाळकरी मुली घरी परतल्या नव्हत्या. या दोघींचा बाजारपेठेसह रेल्वेस्थानक,
बसस्थानक, भरणे, खवटी व आजूबाजूच्या परिसरात शोध घेवूनही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर एका मुलीच्या पालकाने अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली होती.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ही बाब गांभिर्याने घेत तपासाला गती दिली. या दोन्ही मुली गोवा बघण्यासाठी रेल्वेने मडगाव येथे गेल्या होत्या. पोलिसांच्या सतर्कतेने या दोन्ही मुलींना तेथून ताब्यात घेत त्यांचे समूपदेशन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पथकाने कामगिरी फत्ते केली.
Reviewed by ANN news network
on
३/०५/२०२४ ०९:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: