विठ्ठल ममताबादे
उरण : सोशल मीडियावर एका व्यक्तीने ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरल्या बद्दल उरण तालुका ब्राह्मण समाजातर्फे २ मार्च रोजी उरणमध्ये निषेध नोंदविण्यात आला.
ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असे बेताल वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडण्यास कारणीभूत असणाऱ्या त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उरण ब्राह्मण समाजबांधवांतर्फे उरण पोलीस स्टेशनला तसेच तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ब्राह्मण सभा, उरण ट्रस्टचे विराम उपाध्ये, उपाध्यक्ष अनिल दाते, खजिनदार हेमंत धामणकर, सचिव वैभव राईलकर, कार्यकारिणी सदस्य धनंजय उपाध्ये तसेच महिला मंडळ कार्यकारिणी सदस्य श्रीमती नंदीनी राईलकर, श्रीमती मृणाल उपाध्ये, श्रीमती नेहा उपाध्ये,दर्शना देशमुख तसेच मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते.
ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Reviewed by ANN news network
on
३/०३/२०२४ ०८:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: