पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात संघटित गुन्हेगारी करणार्या उजगरे आणि अहिरराव या दोन टोळ्यांवर मोक्काखाली कारवाई केली आहे.तसे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी जारी केले आहेत. पोलिसांनी यावर्षी आजवर शहरातील १० गुन्हेगारी टोळ्यांमधील ३० आरोपींवर मोक्काखाली कारवाई केली आहे.
भोसरी परिसरात दहशत माजविणार्या उजगरे टोळीतील पवन छगन उजगरे ( टोळी प्रमुख) रा. भोसरी पुणे, सुनील जनार्दन सकट, वय ३२ वर्षे, रा. विठ्ठल नगर, अण्णाभाऊ साठे कमानीच्या आत, लांडेवाडी, भोसरी पुणे, दिपक रामकिसन हजारे, वय २७ वर्षे, रा. वय २७ वर्षे, रा. विठ्ठल नगर, अण्णाभाऊ साठे कमानीच्या जवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे अशी मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीवर ६ गुन्हे दाखल आहेत.
तर, थेरगाव, वाकड परिसरात दहशत माजविणार्या अहिरराव टोळीतील आदित्य ऊर्फ निरंजन शाम आहिरराव (टोळी प्रमुख) वय ३१ वर्षे, रा. भक्ती कॉम्प्लेक्स समोर, संस्कृती निवास, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे, प्रतिक अशोक माने, वय २० वर्षे, रा. हवेली कॉम्प्लेक्स, श्रीनगर, थेरगाव, पुणे, प्रेम संदीप तरडे, वय १९ वर्षे, रा. लक्ष्मीदीप सोसायटी, वीर हॉस्पीटल समोर, काळेवाडी पुणे यांच्याविरुध्दही कारवाई करण्यात आली आहे.या टोळीवर १० गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त संदिप डोईफोडे (गुन्हे), बापू बांगर, स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश माने, विशाल हिरे ( वाकड विभाग) यांच्या मार्गदशनाखाली वाकड पोलीसठाण्याचे निरीक्षक विठ्ठल साळुंखे,पी.सी.बी. गुन्हेशाखेचे अनिल देवडे, सहायक निरीक्षक अंबरीष देशमुख,भोसरीचे उपनिरीक्षक सुहास खाडे, वाकडचे उपनिरीक्षक सुहास पाटोळे तसेच हवालदार सचिन चव्हाण,व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, यांच्या पथकाने केली आहे.
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२४ ०९:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: