राज्यशासनाने ४ आय ए एस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. आज १५ मार्च रोजी सायंकाळी हे आदेश निघाले आहेत.पुण्याचे आयुक्त विक्रमकुमार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. राजेंद्र भोसले आले आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
1. श्री विक्रम कुमार (IAS:MH:2004) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. डॉ. राजेंद्र भोसले (IAS:MH:2008) यांची महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री लहू माळी (IAS:MH:2009) यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन, R&FD, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्री कैलाश पगारे (IAS:MH:2010) व्यवस्थापकीय संचालक, M.S. कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची एकात्मिक आदिवासी विकास योजना, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा