पुणे : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिनांक १२ मार्च रोजी पुणे विभागातील २२ ठिकाणचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सकाळी साडेनऊ वाजता व्हिडीओ लिंकद्वारे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
पुणे विभागातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी पुढील ७ ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील:-
1. पुणे रेल्वे स्टेशन: घोरपडी - पुणे येथील घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपोच्या विकासासाठी पायाभरणी आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP) च्या दोन स्टॉलचा संयुक्त समारंभ आयोजित केला जाईल.
2. पाटस स्थानक : पाटस येथील श्री साइडिंगचे गतिशक्ती कार्गो टर्मिनल साइडिंग क्षेत्र राष्ट्राला समर्पित केले जाईल.
3. पिंपरी स्थानक: पिंपरी, चिंचवड, तळेगाव येथे एक आणि शिवाजीनगर येथे वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP) चे दोन स्टॉल आणि पिंपरीच्या जनऔषधी केंद्राचा संयुक्त कार्यक्रम पिंपरी येथे आयोजित केला जाईल.
4. कोल्हापूर स्टेशन: कोल्हापूर येथे वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP) च्या दोन स्टॉल्सचे समर्पण.
5. फलटण स्थानक : फलटण येथे फलटण-बारामती दरम्यान नवीन मार्गिकेच्या कामाचा शुभारंभ समारंभ.
6. मिरज स्थानक: मिरज आणि सांगली येथील वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP) चे दोन स्टॉल्सचे समर्पण तसेच मिरज येथे पुणे-मिरज दुहेरीकरण व लोंडा-मिरज दुहेरीकरण चा लोकार्पण सोहळा.
7. सातारा रेल्वे स्थानक: सातारा येथे वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP) आणि पुणे-मिरज दुहेरीकरण (मसूर-शिरवडे खंड) समर्पण करण्यासाठी संयुक्त समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी होणाऱ्या या समारंभाला तेथील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेच्या पुणे विभातील २२ प्रकल्पांचे करणार व्हिडीओ लिंकद्वारे लोकार्पण
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ १०:३६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ १०:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: