चिंचवडः- जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथील अंतरंग हेल्थकेअरच्या संचालिका आणि आंतरराष्ट्रीय पुष्पौषधी तज्ज्ञ प्रज्ञा नांदेडकर यांचा साईबालाजी एज्युकेशन सोसायटी संचलित आयआयएम एचआरडी कॉलेजतर्फे विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी साई बालाजी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव निरुपमा मुंदडा, संचालिका डॉ. अरुणा देवस्कर, फोब्स मार्शलच्या मॅन्युफॅक्चर युनिटच्या प्रमुख उमा तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी "तरूणांपुढील आव्हाने आणि संधी" या विषयावर बोलताना प्रज्ञा नांदेडकर यांनी तरुणांमधील विविध मानसिक समस्या, परीक्षेचे ताण तणाव, अकारण वाटणारी भीती, समवयस्कांचा दबाव अशा विविध मुद्दयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच या सर्व मानसिक समस्यांसाठी पुष्पौधींचे महत्त्व विशद केले. तरूणांसह सर्वांनी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेताना मोफत पुष्प औषधी समुपदेशनासाठी असलेल्या मोफत हेल्पलाइनवर (नंबर 7030503535) संपर्क करण्याचे आवाहन प्रज्ञा नांदेडकर यांनी यावेळी केले.
आंतरराष्ट्रीय पुष्पौषधी तज्ज्ञ प्रज्ञा नांदेडकर यांना पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
३/१३/२०२४ १२:३१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१३/२०२४ १२:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: